विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर आक्रमण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – मध्यरात्री विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरट्यांनी आक्रमण केले. आक्रमण केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातून गोळीबार केला; परंतु अंधारात चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या आक्रमणात डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तांबे घायाळ झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही दिवसांमध्ये चंदन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. (पोलीस असतांना चंदन चोरी करणारे पळून जातात, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! अशामुळे चंदन चोरीच्या घटना वाढणार नाहीत, तर काय होणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका

सर्वच आक्रमणकर्त्यांचे एकमेव लक्ष्य पोलीस ठरत असतील , तर राज्यात कायदा – सुव्यवस्था राखणार कोण ?