श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासाठी बांगड्या भेट म्हणून पाठवतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी अनुभवलेला आनंद !
१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासाठी काहीतरी पाठवायला हवे’, अशी तीव्र इच्छा होणे, ‘त्यांच्या दैवी हातांना सुशोभित करणार्या बांगड्या पाहून त्या आपत्काळात साधकांचे रक्षण करणारे संरक्षककवच आहेत’, असे जाणवणे
‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे कुटुंबीय चेन्नईला आले होते. ते परत जातांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी काहीतरी पाठवायला हवे’, अशी तीव्र इच्छा झाली. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या यज्ञांचे संगणकीय प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण पहात असतांना यज्ञासाठी उपस्थित असलेल्या ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या दैवी हातांना सुशोभित करणार्या बांगड्यांकडे मी बर्याचदा आकर्षिले जायचे. त्या वेळी मला वाटायचे, ‘त्या केवळ बांगड्या नसून आपत्काळात सर्व साधकांचे रक्षण करणारे संरक्षककवच आहेत.’
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासाठी बांगड्या घेऊन त्या पाठवण्यासाठी लहान खोक्यांमध्ये ठेवणे, प.पू. गुरुदेवांच्या प्रेरणेनुसार श्रीदेवी आणि भूदेवी यांची चित्रे काढून ती खोक्यांवर चिकटवून पाठवणे आणि हे सर्व करतांना भावजागृती होऊन पुष्कळ आनंद अनुभवणे
मी त्यांच्यासाठी बांगड्या घेतल्या आणि त्या दोन वेगवेगळ्या लहान आकारातील खोक्यांमध्ये ठेवल्या. काही घंट्यांच्या कालावधीत मला त्या बांगड्यांचे खोके पाठवून द्यायचे होते. तत्पूर्वी प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला श्रीदेवी आणि भूदेवी (टीप) यांची चित्रे काढण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मी श्रीदेवी आणि भूदेवी यांची चित्रे काढली. ती चित्रे दोन्ही खोक्यांवर चिकटवली आणि पाठवून दिली. हे सर्व करत असतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता आणि भावजागृती होत होती. केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी अल्प कालावधीत ती चित्रे काढून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या चरणी अर्पण करू शकले.’
(टीप : महर्षी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘भूदेवी’ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘श्रीदेवी’, असे संबोधतात.)
– पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (सनातनच्या ६२ व्या समष्टी संत, वय ५९ वर्षे), चेन्नई, तमिळनाडू. (५.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |