Narendra Modi BRICS Summit : भारत शांततेसाठी योगदान देण्यास सदैव सिद्ध !

ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे रशिया-युक्रेन युद्धावरून विधान

पंतप्रधान मोदी (मध्यभागी)

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष हा शांततेच्या मार्गानेच सोडवला पाहिजे, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही. सर्व प्रयत्न हे माणुसकीला प्राधान्य देणारे असले पाहिजेत. भारत शांततेसाठी योगदान देण्यास सदैव सिद्ध आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रशियातील काझन येथे आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या ब्रिक्स परिषदेत ते बोलत होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे औपचारिक स्वागत केले. या वेळी पुतिन म्हणाले की, आमचे संबंध इतके जुने आहेत की, ते स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.

काय आहे ब्रिक्स समूह ?

‘ब्रिक्स’ हा प्रादेशिक घटकांवर प्रभाव टाकणार्‍या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे. यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार जवळपास ४१ टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ब्रिक्स समूहाचा जागतिक व्यापारात १६ टक्के भाग असून जागतिक जी.डी.पी.मध्ये २४ टक्के भाग आहे. या समूहाने जगातील एकूण २९.३ टक्के भूभाग व्यापला आहे.