दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावर होणार्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना !
पुणे – दिवाळीत पुणे रेल्वेस्थानकावरून १ दिवसात अनुमाने दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात जाणार्या विशेषतः दानापूर, गोरखपूर, लखनऊ आदी गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना आखणार आहे. यात सामान्य वर्गाच्या प्रवाशांना बसण्यासाठी ‘व्हीआयपी सायडिंग’ जवळ सोय करण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक डब्यासमोर आर्.पी.एफ्. (रेल्वे पोलीस बल) आणि तिकीट निरीक्षक यांना तैनात करण्यात येणार आहे. विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. आरक्षण केंद्रांवर आणि चालू तिकिटासाठी असलेल्या खिडक्यांची संख्याही वाढवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. सामान्य वर्गातून तिकीट काढणार्या प्रवाशांना रांगेत थांबावे लागू नये म्हणून तिकीट यंत्रांची संख्या वाढवली जाणार आहे.