पुणे येथे भ्रमणभाष चोरणार्या टोळीला अटक !
पुणे – ब्रिटीश गायक अॅलन वॉकर याच्या संगीत रजनी कार्यक्रमामध्ये (लाईव्ह कॉन्सर्ट) चोरांनी ३६ भ्रमणभाष चोरले. या चोरीच्या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुंबई, भाग्यनगर येथील चोरांच्या टोळीला अटक केली आहे. हा कार्यक्रम १८ ऑक्टोबर या दिवशी खराडी येथील एका मैदानावर आयोजित करण्यात आला होता. सय्यद शेख, अखिल गोदावरी, लोकेश पुजारी आणि पप्पू वैश्य अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ भ्रमणभाष हस्तगत केले आहेत.