घुसखोरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ‘जनता एन्.आर्.सी.’ अभियानात सहभागी व्हावे !
सुरेश चव्हाणके यांची अहिल्यानगर येथील ‘शिवप्रेरणा यात्रा’ !
अहिल्यानगर – देशात अनुमाने १० कोटी घुसखोर आहेत. यातील ८० लाख ते १ कोटी महाराष्ट्रात, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ७५ ते ८० सहस्र घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी आहेत. ‘जनता एन्.आर्.सी.’ (जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) अंतर्गत या घुसखोरांची ओळख पटवणे आणि त्यांना देशातून हाकलून देऊन महाराष्ट्राला घुसखोरमुक्त राज्य करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ नेते आणि ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी केले. चव्हाणके यांच्या ‘शिवप्रेरणा यात्रे’चे शहरात आगमन झाल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सुधीर लांडगे, कर्नल नरेश गोयल (निवृत्त) आणि परदेशी आदी उपस्थित होते.
चव्हाणके पुढे म्हणाले की,
१. या घुसखोरांमध्ये बांगलादेशी, अफगाणी, रोहिंगे, पाकिस्तानी यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्राची सुरक्षा आणि संसाधने यांना धोका निर्माण होत असून राज्यावर आर्थिक ताण, गुन्हेगारी आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होत आहे. यासाठी राष्ट्रीय नागरिकत्व कायदा आवश्यक आहे. या हेतूने राज्यभर जनजागृती करण्यासाठी शिवप्रेरणा उपक्रमांतर्गत ‘सजग रहो’ अभियान राबवत आहोत. यात सर्व क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग वाढत आहे.
२. या अभियानांतर्गत आम्ही जनतेला आवाहन करतो की, भारतीय नागरिकत्व असलेल्या नागरिकांना कामावर ठेवावे. जात, धर्म न पहाता राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी गावाची नागरिकत्व पडताळणी करावी. हळूहळू गाव, तालुका, शहर, राज्य आणि नंतर देशात नागरिकत्व पडताळण्याची मोहीम चालू होण्यासाठी हे अभियान आहे.
घुसखोरांना कायमचे हाकलण्यासाठी सर्व भारतियांनी संघटित होऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडावे ! – सुदर्शन वाहिनीचे डॉ. सुरेश चव्हाणके यांचे आवाहन |
हे अभियान मुसलमानांच्या विरोधात नसून भारतात जो कुणी अवैधपणे रहात असेल, त्यांना कायद्याने देशाबाहेर काढण्यासाठी चालू करण्यात आले आहे. देशातील मुसलमान जनतेनेही आमच्या समवेत येऊन घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे ! – सुदर्शन वाहिनीचे डॉ. सुरेश चव्हाणके |