अकोला येथे वंचित बहुजन आघाडीकडून गदारोळ !
अकोला – येथील एका कार्यक्रमात ‘भारत जोडो’ अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गदारोळ घातला. त्यांनी योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडले. ते ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ याविषयी बोलत होते. वंचितच्या कार्यकर्त्यांनी व्यासपिठावर जाऊन ध्वनीवर्धक हातात घेतला. सामान फेकून दिले. यामागील त्यांचे कारण अद्याप समजलेले नाही.