जलतरण स्पर्धेत सनातन संस्थेचे नाशिक येथील साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) यांनी सुवर्णपदक पटकावले !
नाशिक – येथील महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव येथे ‘महाराष्ट्र स्टेट मास्टर्स ऍक्वेटिक चॅम्पियनशिप’ जलतरण स्पर्धा घेण्यात आली. २ दिवसांच्या या स्पर्धेसाठी राज्यातील २६ जिल्ह्यांतून २५ वर्षे वयावरील २७५ पुरुष आणि महिला जलतरणपटू सहभागी झाले होते. यात सनातन संस्थेचे साधक श्री. अनिल पाटील (वय ७८ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी ५० मीटर बॅकस्ट्रोक (पाठीवर पोहणे) आणि ५० मीटर फ्रीस्टाईल (कोणत्याही शैलीत पोहणे) या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. यासाठी त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना प्रशस्तीपत्रक आणि मेडल देण्यात आले.