सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे अंगाला येणारी कंड (खाज) नष्ट होणे
१. दीड मास औषधोपचार करूनही गुप्तांगाला येणारी कंड (खाज) न्यून न होणे
‘गेल्या दीड मासापासून माझ्या गुप्तांगाला कंड येत होती. त्यामुळे माझी कधी कधी झोपमोड व्हायची. त्यावर उपाय म्हणून मी मलम आणि तेल लावणे इत्यादी उपाय करत होतो. त्यानंतर मी ‘होमिओपॅथी’ औषध घेतले, तरी कंड न्यून होत नव्हती. उलट कंड येण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले. त्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. त्या भागात कोणतीही जखम इत्यादी काही नव्हते.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना मला कंड येण्याविषयी लघुसंदेश केल्यावर त्यांनी उत्तर कळवण्यापूर्वीच कंड न्यून होणे
एक दिवस सकाळी उठल्यावर मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना लघुसंदेश केला. सद्गुरु गाडगीळकाका यांनी मला उपाय सांगण्यापूर्वीच मला येणारी कंड आपोआप न्यून झाली. त्या दिवशी सद्गुरु गाडगीळ काका यांच्याबद्दल मला एवढी कृतज्ञता वाटली की, मी दिवसभर भावावस्था अनुभवली.
३. सद्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेल्या नामजपादी उपायांनी कंड नष्ट होणे
सद्गुरु गाडगीळकाका यांनी मला न्यास आणि ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करण्यास सांगितले. त्याप्रमाणे काही दिवस नामजप केल्यानंतर मला येणारी कंड पूर्णपणे थांबली आणि मला बरे वाटले. त्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’
– आपला चरणसेवक,
– श्री. संजय पडेलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |