Cyclone Dana : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चेतावणी
भुवनेश्वर (ओडिशा) – भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि बंगाल यांच्या किनारपट्ट्यांना जाणवेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पुढील २४ घंट्यांत अंदमान समुद्रावरील चक्रीवादळाचे बंगालच्या उपसागरात अल्प दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे.