Nouf Marwai On YOGA : योगाभ्यास इस्लामच्या विरोधात नाही !
सौदी अरेबियातील पहिल्या प्रमाणित योग प्रशिक्षिका आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त नोफ मारवाई यांचे विधान !
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियातील लोकांना हे समजून घेण्याची आवश्यक आहे की, योगाभ्यास इस्लामच्या विरोधात नाही. सौदी अरेबियात योगाला विरोध नव्हता. उलट बाहेरून काही प्रतिकारांना तोंड द्यावे लागले. आपले जीवन सुधारण्यासाठी कोणतेही तत्त्वज्ञान अभ्यासण्यात आणि शिकण्यात काहीही चुकीचे नाही. अर्थात् वैदिक तत्त्वज्ञान आणि योग, हे वेदांच्याच पार्श्वभूमीतून आले आहेत, जे खरोखरच प्राचीन आणि मानवतेसाठी लाभदायी आहेत, असे विधान सौदी अरेबियातील पहिल्या प्रमाणित योग प्रशिक्षिका आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळवणार्या पहिल्या अरब महिला नोफ मारवाई यांनी केले.
‘Yoga is not un-Islamic’ – @NoufMarwaai 1st Saudi Yogacharya, Padma Shri Awardee🧘♀️
Introduced yoga to #SaudiArabia in 2017 🌟
Heads Saudi Yoga Committee & Arab Yoga Foundation 🌱
A slap to the bigoted Mu$l!ms who are against #yoga in India! What do they have to say about… pic.twitter.com/Pntg6XC8u3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 21, 2024
मारवाई यांनी सांगितले की,
१. जेव्हा डॉक्टरांनी माझ्या आई-वडिलांना सांगितले की, माझ्या आजारपणामुळे मी जगणार नाही, तेव्हा मी रियाधमध्ये घरी राहून योग शिकले आणि त्यामुळे माझे आयुष्य खरोखरच पालटले.
२. सौदी अरेबियातील लोकांनी ७ वर्षांपूर्वी कोणताही संकोच न करता योगाचा अंगीकार केला होता. आता ही प्राचीन भारतीय पद्धत देशात फार लोकप्रिय आहे आणि त्यात महिलांचे वर्चस्व आहे.
मारवाई यांचा परिचयमारवाई यांना वयाच्या १७ व्या वर्षी ‘ल्युपस एरिथेमॅटोसस’ या स्वयंप्रतिकार रोगाचे निदान झाले आणि येथूनच त्यांच्या योग प्रवासास प्रारंभ झाला. त्या रियाधमध्ये घरी राहून योग शिकल्या. नंतर त्यांनी योग शिकण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि वर्ष २००८ मध्ये त्या योग आणि आयुर्वेद यांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या. मारवाई यांनी स्वतः सौदी अरेबियामध्ये वर्ष २०१७ मध्ये योगासने शिकवण्यास प्रारंभ केला. वर्ष २०१८ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. वर्ष २०२१ मध्ये स्थापन झालेल्या सौदी योग समितीच्या त्या प्रमुख असून ‘अरब योग फाऊंडेशन’ ही संस्थादेखील चालवतात. |
३. आज सौदी अरेबियात महिला योगासने करतात. या जानेवारीत मक्का येथे अल्-वाहदा क्लब आणि सौदी योग समिती यांनी आयोजित केलेल्या दुसर्या सौदी ओपन योगासन स्पर्धेमध्ये ५६ मुली आणि केवळ १० मुले सहभागी झाली होती.
४. सौदीच्या लोकांना त्यांचा धर्म ठाऊक आहे. वेगवेगळ्या संस्कृतींविषयी जाणून घेण्यास आणि वादग्रस्त नसलेल्या गोष्टीचा अवलंब करण्यास ते मागे-पुढे पहात नाहीत. आरोग्यासाठी चांगली असलेली कोणतीही गोष्ट अंगीकारण्यात त्यांना रस असतो. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनात सौदीच्या नागरिकांसह १० सहस्र लोकांनी सहभाग घेतला होता.
संपादकीय भूमिकाभारतातील योगाभ्यासच्या विरोधात असलेल्या धर्मांध मुसलमानांना चपराक ! यावर ते काय बोलतील का ? |