हिंदूंनो, सण साजरे करण्यामागील उद्देश लक्षात घ्या !

१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे.

२. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संत-महात्म्यांचे कार्य अन् त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.

३. आपण ज्या धर्मात जन्म घेतला, त्या धर्माचे शिक्षण मिळवणे.

४. ईश्वरोपासनेतून कुटुंबात सतत भक्तीभाव आणि धर्मनिष्ठा वृद्धींगत करणे.

५. दैनंदिन ठराविक चाकोरीबद्ध जीवनाला बाजूला सारून देवतांची पूजा, सेवा यांच्या माध्यमातून उच्च सांस्कृतिक जीवनाचा समन्वय साधणे.

६. समाजातील प्रत्येकात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून व्यक्तीसह समाजजीवनही समृद्ध करणे.

अशा विविधांगी आणि व्यापक दृष्टीकोनातून समाजातील धर्म कायम टिकवून संपूर्ण सृष्टीला सुखी करणे, हा उत्सव करण्यामागचा प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश होता.