प्रतिदिन प्राणायाम केल्याने व्यक्तीला होणारे लाभ !
१. ‘व्यक्तीवर पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात.
२. व्यक्तीच्या पंचप्राणांना काही मर्यादेपर्यंत बळ प्राप्त होते. परिणामी तिच्या इंद्रियांचे कार्य सुधारते.
३. व्यक्तीच्या स्थूल आणि सूक्ष्म ऊर्जाप्रवाहांची शुद्धी होते. त्यामुळे तिचे आरोग्य सुधारते.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |