पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
मानवाच्या जीवनात । जेव्हा सुख प्रसंग येतात ।। १ ।।
तेव्हा मन सुख अनुभवते । दु:खाने दु:खी होते ।। २ ।।
हा व्यवहारी अनुभव । मोहानं विसरे मानव ।। ३ ।।
परतून तेच घडतं । तेव्हा सर्व त्याचं नडतं ।। ४ ।।
बुद्धी असून चुकतो । तो महामूर्ख असतो ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)