५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पाचोरा (जिल्हा जळगाव) येथील चि. नारायणी सुयोग आठवले (वय १ वर्ष) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. नारायणी सुयोग आठवले ही एक आहे !
चि. नारायणी सुयोग आठवले (वय १ वर्ष) हिची तिची आई आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. आध्यात्मिक, तसेच वीर पुरुषांच्या कथा वाचल्यावर मन स्थिर होण्यास साहाय्य होणे : ‘गर्भारपणी मी संत मुक्ताबाई, हरिकथासार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची पुस्तके वाचली, तसेच मी भागवत कथाही ऐकल्या. त्यामुळे माझे मन स्थिर होण्यास साहाय्य झाले.
१ आ. ‘बाळ चांगली भक्ती करणारे असावे’, यासाठी देवाला प्रार्थना करणे : ‘जन्मणारे बाळ भगवंतावर अपार श्रद्धा असणारे असेल’, असे मला वाटत होते. त्या दृष्टीने मी बाळाशी संवाद साधत होते. ‘भक्त प्रल्हादाप्रमाणे श्रद्धा आणि भक्ती यांचे वरदान माझ्या बाळाला मिळून त्याला सहज भक्तीची अत्युच्च स्थिती प्राप्त व्हावी’, यासाठी मी देवाला प्रार्थना करत असे. ‘बाळ आनंदी आणि समाधानी आहे’, असे मला जाणवत होते.
१ इ. सात्त्विक गोष्टींची आवड : बाळ गर्भात असतांना आमची कुलस्वामिनी श्री योगेश्वरीदेवी हिचे कुंकू रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सर्वांना लावण्यासाठी ठेवले होते. मी ते कुंकू लावत असतांना बाळाने ‘मलाही लाव’, असे मला आतून सांगितल्याचे जाणवले. मी ते कुंकू सूक्ष्मातून बाळालाही लावले.’
– सौ. सुमुखी सुयोग आठवले (चि. नारायणीची आई), पाचोरा, जळगाव.
१ ई. ‘बाळाच्या आगमनामुळे तुळशीचे झाड वाढणे : ‘वर्ष २०१७ मध्ये फोंडा, गोवा येथे आम्ही नवीन घर घेतले. त्या वेळी सौ. सुमुखीने (सुनेने) तुळस लावण्यासाठी १ कुंडी आणली होती. त्यामध्ये माझे यजमान श्री. सुरेंद्र आठवले यांनी तुळस लावली; परंतु ती तुळस जगली नाही. असे ४ – ५ वेळा झाले. त्यानंतर सुमुखी गरोदर राहिल्यावर यजमानांनी तुळस लावली. आश्चर्य म्हणजे ती तुळस एका मासातच पुष्कळ बहरली. तेव्हा लक्षात आले, ‘बाळाचे आगमन होणार असल्याचा आनंद तुळशीलाही होऊन ती टवटवीत दिसू लागली आहे.’ तुळशीकडे पाहून आमची भावजागृती होत असे.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ३ मास
२ अ १. सौ. सुमुखीला मुलगी झाल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ‘देवीतत्त्व आपल्या घराण्यात आले आहे’, असे मला वाटले.
२ अ २. ‘नारायणी’ अशी हाक मारल्यावर बाळाने प्रतिसाद देणे : बाळाच्या नामकरण विधीसाठी आम्ही सुमुखीच्या माहेरी पाचोरा, जिल्हा जळगाव येथे गेलो होतो. ‘मी नारायणीला जवळ घेतल्यावर तिची आणि माझी पुष्कळ पूर्वीची ओळख आहे’, असे मला जाणवत होते. मी तिला हाक मारल्यावर ती माझ्या बोलण्याला चांगला प्रतिसाद देत होती.’
– सौ. सुप्रिया आठवले (चि. नारायणीची आजी, वडिलांची आई), फोंडा, गोवा.
२ अ ३. देवाची आवड : ‘नारायणीचा जन्म झाल्याच्या तिसर्या दिवशी मी तिला संत मुक्ताबाईच्या पुस्तकातील एक गोष्ट सांगत होते. तेव्हा ती माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती.
२ अ ४. बाळाला स्वयंसूचना सत्र म्हणून दाखवल्यावर त्याचा लाभ होणे
अ. नारायणीच्या जन्मानंतर परिचारिकेने तिला बाटलीने दूध पिण्याची सवय लावली होती. तिची ती सवय मोडण्यासाठी मी तिच्या डोक्यावर हात ठेवून स्वयंसूचना सत्र केले. काही दिवसांतच तिची बाटलीने दूध पिण्याची सवय पालटली.
आ. नारायणीला सतत खालचा ओठ चावण्याची सवय होती. यासाठीही मी तिला स्वयंसूचना सत्र म्हणून दाखवले. त्यानंतर तिची ओठ चावण्याची सवय न्यून झाली.
२ आ. वय – ३ ते ६ मास
२ आ १. अनुकरण करणे : माझी आई (सौ. रेखा जाधव, जळगाव (वर्ष २०२३ मधील आध्यामिक पातळी ६२ टक्के, वय ४९ वर्षे) प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयोग करायची अन् नारायणीला तिच्या मागून म्हणायला सांगायची. तेव्हा नारायणी ‘हं, अ’ असे शब्द उच्चारून तिला प्रतिसाद द्यायची. त्या वेळी ‘ती प्रार्थनेतील शब्द जाणत असून प्रार्थना करत आहे’, असे मला वाटायचे.
२ आ २. समंजसपणा : नारायणी ३ मासांची असतांना एकदा मध्यरात्री झोपेतून उठून आवाज करायला लागली. तेव्हा मी तिला हळू आवाजात सांगितले, ‘‘सगळेजण झोपले आहेत. रात्र झाली आहे. आवाज करायचा नसतो.’’ त्यानंतर ती हळू आवाज करून खेळायला लागली आणि झोपवल्यावर लगेच झोपली. त्यानंतर ती आसपास कोणी झोपले असल्यास आवाज करत नसे.’
– सौ. सुमुखी सुयोग आठवले
२ आ ३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘नारायणीची समष्टी प्रकृती आहे’, असे सांगणे : ‘नारायणी ५ मासांची झाल्यावर आम्ही तिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात घेऊन गेला होतो. त्या वेळी काही साधिका तिच्याजवळ आल्या असता ती प्रत्येकीला चांगला प्रतिसाद देऊन हसत होती. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘नारायणीची समष्टी प्रकृती आहे.’’ – सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले
२ इ. वय – ६ ते ९ मास
२ इ १. ‘नारायणीला दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघून हसते आणि त्यांच्याकडे बघत रहाते.
२ इ २. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : काही जण नारायणीकडे बघून हसले, तरी ती त्यांच्याकडे बघून हसत नाही किंवा ते तिला घेण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडे जात नाही; मात्र काही वेळा पहिल्यांदाच भेटत असलेल्या माणसांकडे पाहून ती स्वतःहून हसते आणि त्यांच्याकडे जातेही. यावरून ‘तिला सूक्ष्मातील कळते’, असे मला वाटते.
२ ई. वय – ९ ते १२ मास
२ ई १. शिकण्याची वृत्ती
अ. एकदा माझी आई (सौ. रेखा जाधव, जळगाव ( आध्यामिक पातळी ६१ टक्के, वय ५० वर्षे) स्वतःला कुंकू लावत होती. तेव्हा नारायणीने ‘मलाही लाव’, असे म्हणून स्वतःचा चेहरा पुढे केला आणि शांतपणे कुंकू लावू दिले. पुढच्या वेळी ती आम्हा दोघींनाही कुंकू लावण्याचा प्रयत्न करू लागली.आ. नारायणी तिला शिकवलेल्या गोष्टी पटकन शिकते, उदा. ती परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला डोके टेकून नमस्कार करते.
२ ई २. उत्तम एकाग्रता : नारायणीची दृष्टी स्थिर असून ती दूरवर व्यक्ती किंवा वस्तू यांच्याकडे बघत राहते. त्यावरून तिची एकाग्रता चांगली असल्याचे लक्षात येते.
२ ई ३. संगीत आणि नृत्य यांची आवड : नारायणीला संगीत आणि नृत्य यांची आवड आहे. संगीत ऐकू आल्यावर तिचे लक्ष तत्परतेने तिकडे जाते आणि तिच्या चेहर्यावर हास्य येते. अनेकदा ती संगीताच्या तालावर हातपाय हलवून नाचण्याचा प्रयत्न करते.
२ ई ४. संतांप्रती भाव : एकदा नारायणीला झोक्यामध्ये झोपवत असतांना मी तिच्या हातात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे छायाचित्र असलेले एक शुभेच्छापत्र दिले होते. त्या वेळी ती बराच वेळ त्या पत्राकडे पाहून हसत आणि बोलत होती.
३. स्वभावदोष : हट्टीपणा करणे
‘प.पू. गुरुमाऊली, आपल्या कृपेने आम्हाला नारायणीसारखे गुणी बाळ मिळाले आहे. आपल्याला अपेक्षित असे तिचे संगोपन करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सुमुखी सुयोग आठवले (चि. नारायणीची आई), पाचोरा, जळगाव. (१०.६.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |