Reappoinment Railways : २५ सहस्र निवृत्त रेल्‍वे कर्मचार्‍यांना भारतीय रेल्‍वे पुन्‍हा कामावर घेणार !

विद्यमान कर्माचार्‍यांवरील कामाचा ताण वाढल्‍याने अपघातांच्‍या घटनांत वाढ !

नवी देहली – साधारण २५ सहस्र सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना कामावर रुजू केले जाणार असल्‍याची माहिती भारतीय रेल्‍वेने दिली आहे. यासाठी काही अटीही ठेवण्‍यात आल्‍याचे विभागाने सांगितले. रेल्‍वेत कर्मचार्‍यांची न्‍यूनता जाणवू लागली आहे. गेल्‍या काही दिवसांत विद्यमान कर्माचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. त्‍यामुळे काही ठिकाणी अपघाताच्‍या घटनाही घडल्‍या आहेत.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची निवड करण्‍याच्‍या अटी !

१. ‘ट्रकमॅन’पासून ‘सुपरवायझर’ पदांपर्यंतची पदे भरली जाणार.

२. कर्मचार्‍यांचे वय ६५ वर्षांपेक्षा अल्‍प हवे.

३. कर्मचार्‍यांच्‍या विरोधात निवृत्त होण्‍याच्‍या आधीच्‍या ५ वर्षांत अनुशासनात्‍मक कारवाई झालेली नसावी.

४. कर्मचार्‍यांना २ ते ५ वर्षांसाठी कामावर घेतले जाईल.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा किती पगार असणार ?

१. कर्चमार्‍यांना त्‍यांच्‍या निवृत्तीच्‍या वेळी असलेला शेवटचा पगार वेतन म्‍हणून दिला जाईल.

२. यासमवेत प्रवास खर्च आणि इतर भत्तेही दिले जातील.

३. ज्‍या कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन दिले जाते, अशांना त्‍यांच्‍या पगारातून निवृत्तवेतनाची रक्‍कम वजा करून उर्वरित रक्‍कम वेतन म्‍हणून दिले जाईल.