Air India Muslim officer :  मुसलमान महिला अधिकारी कपाळावर टिळा लावण्‍यास देत नाही; मात्र मुसलमानांना नमाजपठण करू देते !

  • एअर इंडियातील हिंदु महिला कर्मचार्‍याचा आरोप

  • पंतप्रधान मोदी यांच्‍याकडे केली तक्रार

चंचल त्‍यागीना टिळा लावण्‍यापासून रोखले

नवी देहली – येथील इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर कार्यरत एअर इंडियाच्‍या महिला कर्मचारी चंचल त्‍यागी यांनी सामाजिक माध्‍यमांतून एक व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्‍यांनी त्‍यांच्‍या मुसलमान महिला अधिकार्‍याकडून करण्‍यात आलेला छळाची माहिती दिली आहे. या वादावर एअर इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्‍तव्‍य आलेले नाही. ‘एअर इंडियाची मुसलमान अधिकारी मेहजबीन यांनी मी पूजा केल्‍यानंतर कपाळावर टिळा लावण्‍यापासून रोखले’, असा आरोप चंचल त्‍यागी यांनी केला आहे.

१. त्‍यागी यांनी त्‍यांना झालेल्‍या त्रासाच्‍या विरोधात देहली पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार केली आहे. त्‍यानंतरही कारवाई न झाल्‍याने त्‍यांनी हा व्‍हिडिओ प्रसारित करून पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अन्‍य नेते यांच्‍याकडे न्‍यायाची मागणी केली आहे.

२. त्‍यागी यांनी सांगितले, ‘मी पूजा केल्‍यानंतर टिळा लावते. या लावण्‍यावर आस्‍थापनातील कुणाचाही आक्षेप नव्‍हता; पण मेहजबीन आल्‍यावर तिने टिळा लावण्‍यावर आक्षेप घेतला आणि तो पुसून टाकण्‍यासाठी दबाव आणण्‍यास चालू केले. जर टिळा लावून कार्यालयात आलीस, तर तुझ्‍यावर कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली. चंचल त्‍यागी यांनी सांगितले की, मेहजबीनने मुसलमान कर्मचार्‍यांना दिवसातून ५ वेळा नमाजपठण करण्‍याची अनुमती दिली आहे.

३. या आरोपांविषयी मेहजबीन यांच्‍याशी चर्चा केली असता तिने सर्व आरोप निराधार असल्‍याचे सांगितले. ती म्‍हणाली की, आस्‍थापनाचे नियम आणि गणवेश सर्व कर्मचार्‍यांना सारखेच लागू होतात, मग ते हिंदू असो किंवा मुसलमान. त्‍यानुसार हिंदु कर्मचार्‍यांना टिळा लावण्‍यास आणि मुसलमान कर्मचार्‍यांना टोपी घालण्‍यास अनुमती नाही. विमानतळावर वेगवेगळ्‍या धर्माचे प्रवासी असतात आणि त्‍यामुळे कोणतेही धार्मिक चिन्‍ह दाखवू नयेत, यासाठी हे नियम करण्‍यात आले आहेत.

संपादकीय भूमिका

एअर इंडियाने या घटनेची चौकशी करून सत्‍य स्‍थिती जनतेला सांगितली पाहिजे !