Bhagwa Atankwad Wrong Remark : मी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता ! – सुशीलकुमार शिंदे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उपरती
मुंबई – मी ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरायला नको होता. मला माझ्या पक्षानेच भगवा आतंकवाद होत असल्याचे सांगितले होते. पक्षाच्या सांगण्यावरूनच मी तो शब्द वापरला; पण मी तो का वापरला, ते मलाही ठाऊक नाही. तो शब्द चुकीचा होता. ही त्या पक्षाची विचारधारा असते. पांढरा, लाल किंवा भगवा असा कोणताही आतंकवाद नसतो, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. काँग्रेस प्रणीत तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सांगत त्यांनी त्यावर टीका केली होती. (इस्लामी आतंकवाद अस्तित्वात असूनही त्याविषयी काँग्रेसींनी कधी ‘ब्र’ काढला नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) याविषयी त्यांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. ती अद्याप प्रसारित व्हायची आहे; मात्र त्यातील काही क्लिप्स प्रसारित झाल्या असून त्यात शिंदे वरील वक्तव्य करत असल्याचे दिसून येत आहे.
Senior Congress leader and former Home Minister Sushil Kumar Shinde admits: ‘Bhagwa Atankwad’ (Saffron terrorism) remark was wrong!
Podcast with @shubhankrmishra
👉This phrase harmed Hindus globally, but will Shinde’s confession undo the damage? 🤔
👉Hindus demand strict… pic.twitter.com/Cfd6qPwc3m
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 20, 2024
‘भगवा आतंकवाद’ शब्दाचा उच्चार कधी केला होता ?
जानेवारी २०१३ मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात सुशीलकुमार शिंदे यांनी देशात झालेल्या आतंकवादाच्या घटनेला काही हिंदु संघटनांना उत्तरदायी धरून ‘भगवा आतंकवाद’ हा शब्द वापरला होता. हा शब्द त्यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात वापरला. ‘काही हिंदुत्ववादी संघटना आतंकवाद पसरवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात समोर आले आहे’, असे ते म्हणाले होते.
संपादकीय भूमिका
|