Kerala Fake Doctor Arrest : केरळमध्‍ये जमालुद्दीन या बनावट डॉक्‍टरला विनामूल्‍य वैद्यकीय शिबिर घेतांना अटक !

कासरगोडु (केरळ) – बनावट औषधे बनवून उपचारही करत असल्‍याच्‍या आरोपावरून केरळ पोलिसांनी मंजेश्‍वर या गावातून एका बनावट डॉक्‍टरला अटक केली आहे. पलक्‍कडच्‍या मर्ण्‍णाकाड कळरिक्‍कल येथील ५६ वर्षीय रहिवासी सी.एम्.जमालुद्दीन असे अटक करण्‍यात आलेल्‍या बनावट डॉक्‍टरचे नाव आहे.

१. पोलीस उपनिरीक्षक के.व्‍ही. सुमेशराज यांनी माहिती दिली की, बनावट डॉक्‍टरला उप्‍पळ पच्‍चंपारामधून अटक करण्‍यात आली आहे. तेथे ‘फ्रेंड्‍स क्‍लब’मध्‍ये जमालुद्दीनच्‍या नेतृत्‍वाखाली शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.

२. कोणतीही पात्रता किंवा कागदपत्रे नसतांना रुग्‍णांची तपासणी करून औषधे देत असल्‍याच्‍या आरोपाखाली त्‍याला अटक करण्‍यात आली.

३. बनावट डॉक्‍टर वैद्यकीय शिबिर आयोजित करत असल्‍याची माहिती जिल्‍हा वैद्यकीय अधिकारी के. संतोष यांना मिळाली होती. यासंदर्भात चौकशी करण्‍याचे उत्तरदायित्‍व उपजिल्‍हा वैद्यकीय अधिकार्‍यांना देण्‍यात आले होते.

४. अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी जाऊन पडताळणी केली असता जमालुद्दीन याच्‍याकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

संपादकीय भूमिका

देशात अल्‍पसंख्‍य असलेले गुन्‍हेगारीतील प्रत्‍येक क्षेत्रात बहुसंख्‍य !