Maharashtra Election 2024 : राज्यात ४ दिवसांत आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी !

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल’ या अ‍ॅपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांपैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले.

आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू यांच्या संदर्भातील १० लाख ६४ सहस्र रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.