Secunderabad Police Lathi Charge Against Hindus : सिकंदराबाद (तेलंगाणा) येथे शांतपणे आंदोलन करणार्या हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार
मुथ्यालम्मा मंदिरामधील मूर्तीची मुसलमानाने केलेल्या तोडफोडीचे प्रकरण
सिकंदराबाद (तेलंगाणा) – येथे १४ ऑक्टोबर या दिवशी मुथ्यालम्मा मंदिरामधील मूर्तीची सलमान सलीम या मुसलमान तरुणाने तोडफोड केली होती. त्याला पोलिसांनी अटकही केली; मात्र पोलीस यामागील अन्य लोकांवर कठोर कारवाई करत नाही. यामुळे हिंदू आंदोलन करत आहेत. शांततेत आंदोलन करत असणार्या हिंदूंवर पोलिसांनी लाठीमार केला. भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी शांततेने निदर्शने करणार्या हिंदूंवर लाठीमार करणार्या पोलिसांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
१. मंदिरांवरील आक्रमणाच्या निषेधार्थ विश्व हिंदु परिषदेने तेलंगाणा बंदची हाक दिली होती. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, मंदिरावरील जिहादी आक्रमणे आणि आता हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार चिंताजनक, निषेधार्ह आणि अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा आहे. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
२. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले की, ज्याने मूर्तीची हानी केली ती व्यक्ती येथे चोरी करण्यासाठी आली नव्हती, तर हिंदू समाजाचा अपमान करण्यासाठी आली होती. भाग्यनगरमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी आणि दंगल करण्यासाठी काही लोक हे जाणूनबुजून करत आहेत. आज सरकार काय करत आहे, तर कारवाईची मागणी करणार्या आंदोलकांना मारहाण करत आहे आणि दुसरीकडे श्री मुथ्यलम्मा मंदिरात घुसून मुख्य मूर्तीची विटंबना करणार्या सलमान सलीमला काँग्रेस सरकार कारागृहात बिर्याणी खाऊ घालत आहे. तेलंगणातील काँग्रेसच्या रेवंत रेड्डी सरकारने लाठीमार केला हा कोणता न्याय ? तर त्याने आता इतर आरोपींना पकडायला हवे होते !
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर अन्याय आणि मुसलमानांना ‘खैरात’ असाच कारभार केला जातो, हे यातून पुन्हा एकदा दिसून आले ! |