Haridwar Bulldozer On Illegal Mazaar : हरिद्वार (उत्तराखंड) येथे सरकारी भूमीवर बेकायदेशीररित्‍या बांधण्‍यात आलेला मकबरा प्रशासनाने पाडला

(मकबरा म्‍हणजे मुसलमान व्‍यक्‍तीला पुरल्‍यानंतर त्‍या ठिकाणी करण्‍यात आलेले बांधकाम )

बेकायदेशीर मकबरा पाडताना

हरिद्वार (उत्तराखंड) – येथील एक बेकायदेशीर मकबरा प्रशासनाने उद़्‍ध्‍वस्‍त केला. पाटबंधारे विभागाच्‍या भूमीवर अतिक्रमण करून तो बांधण्‍यात आला होता. प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस देऊनही अतिक्रमण काढण्‍यात आले नाही. त्‍यामुळे ही कारवाई करण्‍यात आली. या वेळी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. या मकबर्‍याविषी ग्रामस्‍थांनी तक्रारही केली होती.

उत्तराखंड सरकारने सुमारे १ सहस्र बेकायदेशीर थडग्‍यांची सूची बनवली आहे. यांवर एकामागून एक कारवाई चालू आहे. उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री पुष्‍कर सिंह धामी यांनी यापूर्वीच त्‍यांच्‍या राज्‍यात ‘लँड जिहाद’ होणार नसल्‍याचे सांगितले आहे.

संपादकीय भूमिका

देशात बेकायदेशीर बांधकाम होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ? आता कारवाई केल्‍यानंतर तेथे पुन्‍हा बेकायदेशीर बांधकाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेणार आहे का ?