Bulldozer On Naseeb Choudhary House : संघ स्‍वयंसेवकांवर आक्रमण करणार्‍या नसीब चौधरीचे बेकायदेशीर घर प्रशासनाने पाडले !

नसीब चौधरीचे बेकायदेशीर घर प्रशासनाने पाडले

जयपूर (राजस्‍थान) – येथील शिवमंदिरामध्‍ये रा.स्‍व. संघाच्‍या स्‍वयंसेवकांकडून शरद पौर्णिमा साजरी केली जात असतांना शेजारी रहाणार्‍या नसीब चौधरी याने त्‍याच्‍या मुलांसह चाकूद्वारे स्‍वयंसेवकांवर आक्रमण केले होते. त्‍यात संघाचे १० स्‍वयंसेवक घायाळ झाले होते. या प्रकरणी आता प्रशासनाने नसीब चौधरी याच्‍या बेकायदेशीर घरावर कारवाई करत ते पाडून टाकले. याआधी त्‍याला नोटीस बजावण्‍यात आली होती.

संपादकीय भूमिका

केवळ घर पाडून थांबू नये, तर अशी घरे पुन्‍हा बांधली जाऊ नयेत, यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! तसेच अन्‍य अतिक्रमणेही सरकारने पाडली पाहिजेत !