केंद्र सरकारने हिंदु संघटनांच्या पदाधिकार्यांना वक्फ विधेयकावरील बैठकीत बोलावल्यावर त्याला विरोध करणारे मुसलमान नेते कधीतरी सर्वधर्मसमभाव दाखवतील का ?
वक्फ बोर्डाच्या संदर्भातील विधेयकावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या १४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी नवी देहली येथे झालेल्या बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. या बैठकीत हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावरून विरोधी पक्षाने याला आक्षेप घेतल्याने हा गदारोळ झाला. यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधक आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन संयुक्त समितीच्या अध्यक्षांना हटवण्याची मागणी करणार आहेत.
बैठकीला उपस्थित राहिलेले हिंदु संघटनांचे प्रतिनिधी !
बैठकीला नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज, सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय आदी उपस्थित होते. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनाही बोलावण्यात आले होते.’