बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींकडून ‘स्नॅपचॅट’चा वापर !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आरोपींनी ‘स्नॅपचॅट’ या संगणकीय प्रणालीचा वापर केल्याचे समजते. आरोपीच्या भ्रमणभाषमध्ये सिद्दीकी यांचा मुलगा झिशान याचेही छायाचित्र सापडले आहे. हे छायाचित्र ‘स्नॅपचॅट’द्वारे एकमेकांना पाठवण्यात आले होते, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.