ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक आणि जामिनावर सुटका !
सोलापूर – धनादेश न वटल्याच्या प्रकरणात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक करण्यात आली. जामीन संमत होऊन त्यांची त्वरित सुटका झाली. ७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे.
लक्ष्मण हाके यांच्या मालकीचे आस्थापन विजया इन्फ्राने सिद्धीविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीस वर्ष २०२१ मध्ये ३ लाख रुपयांचा धनादेश दिला होता; मात्र हा धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले. पंढरपूर पोलिसांनी त्यांना अटक केली. सत्र न्यायालयात त्यांना जामीन संमत झाला.
लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे आरक्षण टिकण्यासाठी गत काही दिवस आंदोलन केल्यामुळे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना विरोध केल्याने चर्चेत आले होते. ते मूळचे सांगोला तालुक्यातील आहेत.