विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, चौकांमधील भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
कोल्हापूर – ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’च्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
१. हुपरी नगरपालिकेत मुख्याधिकारी अजय नरळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे तालुका संयोजक श्री. नितीन काकडे, बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. सागर मेथे आणि उपशहरमंत्री श्री. युवराज खराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. ऋषिकेश साळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन माळी आणि श्री. संदीप सिंदनोर्ले, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री प्रशांत साळोखे, प्रताप भोसले, रोहित देसाई, नीलेश कदम, सुनील पाटील, महादेव आढावकर, ओंकार आढावकर, संजय पाटील, संदीप शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
२. कागल येथे नायब तहसीलदार रूपाली सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कागल तालुकाध्यक्ष श्री. विनायक आवळे, विभागअध्यक्ष श्री. अमोल आवळे, विश्व हिंदु परीषद कागल प्रखंड महामंत्री श्री. अरुण कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक भोपळे यांसह अन्य उपस्थित होते.