पुणे येथे ग्रंथालयातील आगीत पुस्तकांची मोठी हानी !

पुणे – शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ग्रंथालयाला आग लागली असून यामध्ये पुस्तके खाक झाली आहेत. येथील गांजवे चौकाजवळ ही आग लागली आहे. या परिसरामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वाचन आणि अभ्यास करत असतात. यातील तिसर्‍या मजल्यावर असलेल्या ध्रुवतारा अभ्यासिकेला आग लागली. आगीमध्ये पुस्तके, कपाटे आणि ग्रंथालयातील संगणक यांची हानी झाली आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नाही. ग्रंथालयामध्ये आग नेमकी का लागली ? याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.