पर्यावरणाला अनुकूल सनातन धर्माची दृष्टी !
पूर्वार्ध
१. आधुनिकतेसह पर्यावरणाचाही विचार होणे आवश्यक !
हिंदु ही संपूर्ण जगात केवळ एकच सभ्यता अशी आहे, जी १ सहस्र ४०० वर्षांपासून निरंतरपणे स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे. हिंदु राष्ट्राची मागणी करतांना कोट्यवधी हिंदूंनी हिंदु धर्म आणि पवित्र धरणीमाता यांच्यासाठी वर्षानुवर्षे बलीदान दिले आहे. हा हिंदूंचा देश आहे. येथील धर्म, संस्कृती, विचारसरणी आणि परंपरा सनातनी हिंदु आहेत. आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्मांड किंवा सृष्टी यांचा खोलवर अभ्यास करून दायित्वाच्या रूपात आपल्याला परंपरा सोपवल्या आहेत. त्यांचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे. या परंपराचा भाग, म्हणजे आपली वैदिक शेती होती. ती पूर्वी संपन्न होती. त्याउलट आज ‘हरित क्रांती’ आली आहे. त्यामुळे आपल्या शेतीची प्रचंड हानी झाली आहे. आपल्याकडे वनशेती होती, वैदिक अर्थव्यवस्था होती आणि पाणी साठवण्याची व्यवस्था होती. अशा प्रकारे प्रत्येक विषयाची व्यवस्था होती. आज सौर ऊर्जेचे (सोलर एनर्जीचे) भूत सर्वांच्या मानगुटीवर बसले आहे. प्रत्येक पावले उचलण्यापूर्वी आपण आपल्या मूळ चालत आलेल्या गोष्टींवर खोलवर विचार केला पाहिजे. परी+ आवरण = पर्यावरण, म्हणजे आपल्या आसपास जे काही आहे, ते पर्यावरण आहे.
२. पर्यावरणाचे रक्षण हाच आपला धर्म आणि आपले आचरण !
आमच्या उपनिषदात म्हटले गेले आहे,
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ।। – ईशावास्योपनिषद्, श्लोक १
अर्थ : ‘जगातील सर्व जीवन ईश्वराने व्यापलेले आहे. ‘कर्ता-करविता तोच आहे’, या भावाने स्वतःच्या कर्तेपणाचा त्याग करून, मनुष्याने जीवनातील यथाप्राप्त भोग भोगत जावे. कुणाच्याही धनाविषयी आसक्ती बाळगू नये.
आपल्याला आदिकाळापासून शिकवले गेले आहे की, प्रत्येक तत्त्वात ब्रह्म व्यापलेले आहे. आपण सर्व स्वतंत्र आहोत, कुणालाही कसलाही अधिकार नाही. आपल्याला हे सोडायचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर आणि तिच्या संपदेवर सर्वांचा अधिकार आहे; पण मनुष्याला त्याचा संग्रह करण्याचा मुळीच अधिकार नाही.
जगात अशी कोणतीच सभ्यता नाही. ज्यात लक्षावधी लोक ‘सर्वे भवन्तु सुखिनः ।’ प्रतिदिन मंदिरात आणि घरात म्हणतात, म्हणजे ते ‘सर्व प्राणीमात्र सुखी होवोत.’ असे म्हणतात. ‘ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु । सर्वेषां शान्तिर्भवतु । सर्वेषां पूर्णं भवतु ।’, म्हणजे ‘सर्वांचे कल्याण होवो, सर्वांमध्ये शांती प्रस्थापित होवो, सर्वांमध्ये पूर्णत्व येवो.’
याचाच अर्थ असा की, आपण झाडावरील एका पानाचीही जर इच्छा करत असाल की, ते आपल्याला मिळावे, तर ही विचारसरणी चालत नाही. आपल्या शास्त्राने त्याविरुद्ध आणखी एक गोष्ट सांगितली आहे. आपल्यावर पर्यावरणाचे पुष्कळ दायित्व सोपवले गेले होते. शास्त्र तर संपूर्ण ब्रह्मांड आणि संपूर्णतः पर्यावरण यांच्या आसपासच फिरत आहे. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक विचार तेथूनच निर्माण होतो. आपल्याला जे सांगितले गेले आहे, त्याचे आपल्याला पालन करायचे असते. भूतयज्ञाचे दायित्वही आम्हा मानवांना दिले आहे. आपण केवळ आपल्या घरात डोकावून पहावे की, किती घरांमध्ये भूतयज्ञ म्हणजे गायीसाठी, चिमण्यांसाठी, मुंग्यांसाठी अन्नपदार्थ काढून ठेवले जातात ? आपल्याकडे असे म्हटले जाते की, ‘कावळ्याला खाऊ घातले, तर काय तुमच्या पितरांना मिळणार का?’, ‘मुंग्यांना खाऊ घातल्यामुळे काय होते ?’, त्यामुळे बुरसटलेले आपण नाही, तर त्यांची बुद्धी आहे, जे या सर्वश्रेष्ठ ऋषींच्या आर्थिक पर्यावरण शास्त्रावर प्रश्नचिन्ह करतात.
३. पर्यावरणाच्या दृष्टीने चिमण्यांचे महत्त्व
पूर्वी जागोजागी वटवृक्ष दिसत होते. आता विकासाच्या नावाखाली ते आपल्या शहरातून आणि गावातून नष्ट होत चालले आहेत. चिनी ग्रेट लीप याने म्हटले, ‘आपण औद्योगिकरण केले, तर १५ वर्षांमध्ये ब्रिटनला मागे टाकू.’ त्यामागे तत्त्व होते की, एक चिमणी एका दिवसात किमान साडेचार किलो अन्न खाते. त्यामुळे तिला जिवंत रहाण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यासाठी म्हणून त्या लोकांनी एक चळवळ चालवली. एका संस्थेचे गट पुष्कळ संख्येने वृक्षांच्या खाली जाऊन बिगूल आणि थाळी वाजवायचे. त्यांनी १५० बंदूक चालवण्याची मोकळी स्थाने बनवली. तेथे उडत्या चिमणीला कसे मारायचे, याचे लहान मुलांनाही प्रशिक्षण दिले जात होते. तेथे पक्ष्यांना नष्ट करण्यास थोडाही वेळ लागला नाही. चिमणी पुष्कळ किडे आणि आळ्या खाते, तसेच ती तिच्या पिल्लांना खाऊही घालते. त्यामुळे अगणित वाढणार्या कीड्यांची संख्या नियंत्रणात रहाते. चिमणी नसल्यामुळे किड्यांचे एक केंद्रस्थान होते. ग्रेट लीपच्या धोरणामुळे चिमण्या नष्ट झाल्या. त्यानंतर तेथे किड्यांची संख्या एवढी वाढली की, टोळधाड येऊन किड्यांनी संपूर्ण शेतातील पीक नष्ट केले.
जगातील ७२ टक्के पीक परागीभवनावर अवलंबून आहे. आपल्याला चिमण्या, फुलपाखरे, भोवरे, कण, कीटक, पक्षी, प्राणी, हे सर्वच आवश्यक आहेत. ते नसतील, तर आपल्या पिकाची हानी होईल. वटवृक्षाचे बीज फारच लहान असते आणि ते आतून निघते. ते असेच अंकुरित होत नाही. कावळ्याच्या विष्टेतून दुसरीकडे पडल्यानंतरच ते अंकुरित होते. ते आतमध्ये सिद्ध असलेले बीज असते. श्राद्धपक्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात कावळ्यांना खाऊ घातले जाते. कावळ्यामुळे संपूर्ण भारतात ठिकठिकाणी वटवृक्षाचे बीज पडून ते अंकुरतात.
वर्ष १९५९ ते १९६१ पूर्वी चीनमध्ये लोक आपल्यासारखे बरेच सात्त्विक भोजन करत होते. चीनमध्ये औद्योगिकीकरणाच्या वेडामुळे वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे तेथे मोठा दुष्काळ पडला आणि लोक भुकेने मरू लागली. त्यामुळे त्यांनी झाडाची पाने आणि झाडाच्या सालीवर रांगणारे कीडे खाणे चालू केले. तेव्हापासून त्यांनी कीडे खाणे चालू झाले. चीनमध्ये आज सर्वकाही खातात. चिमण्यांना नष्ट केल्यामुळे ही स्थिती आली, असे म्हटले जाते. मानव कधीच निसर्गाशी लढू शकत नाही आणि निसर्गाला कधी जिंकू शकत नाही. निसर्ग हा त्याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
पुष्कळसे कीडे कुणाचे तरी शिकार होतात किंवा कुणाची तरी शिकार करतात. त्यामुळे ही पर्यावरण व्यवस्था टिकून रहाते. चिमण्या संपूर्ण जगात लाखो कीडे प्रतिवर्षी खातात. पर्यावरण व्यवस्था स्वतःच संतुलन राखत असते. आपल्यापैकी किती लोक चिमण्यांना दाणे खाऊ घालतात ? चिमण्या या पर्यावरणातील पालट दर्शवण्याच्या द्योतक आहेत. चिमण्या आहेत, म्हणजे पर्यावरण ठीक आहे. जर चिमण्या नसतील, तर पर्यावरण चांगले रहाणार नाही.
४. भूमी सुपीक ठेवण्यासाठी कार्य करणार्या मुंग्या, वाळवी आणि गांडूळ
भारतात शेतीसंस्कृती आहे. शेतकरी पीक क्रमवार घेण्याचे जाणत होते. गहू पिकवला, तर भूमीतील नायट्रोजन वायू न्यून होऊन जातो. नायट्रोजन न्यून झाला, तर पुढील पीक ते संतुलित करील. त्यांना हे माहिती असते की, पाणी कुठून निघणार ? पाऊस केव्हा येणार ? कशा प्रकारचे पीक कोणत्या वेळी लावायचे असते ?
मुंग्या, वाळवी आणि गांडूळ यांमुळे भूमी भुसभुशीत रहाते. आज जैविक खत बनवले जाते, तसेच गांडूळ घालून गांडूळ खत बनवल्या जाते. पूर्वी तर आपण सर्व काही नष्ट केले होते. आता आपण ते पुन्हा निर्माण करत आहोत. पूर्वी घराघरातील हिंदू मुंग्यांना खाऊ घालत असे. मुंग्यांमुळे आपल्या घराच्या आसपास जी माती आहे, तिच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता निर्माण होते. मोठी झाडे लावल्याने भूमी झाकली जाईल. भूमी झाकल्यामुळे भूमीतील पाण्याचा स्तर चांगला राहील. अशा अनेक गोष्टी पुष्कळ सर्व विविध हिंदु ग्रंथांमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत.
जंबू फळाला ‘रोज ॲपल’ म्हणतात. ‘जंबू फळाच्या (जांभ) वृक्षाच्या पूर्व दिशेला ३ हाताच्या अंतरावर जर तुम्हाला वाळवीचा ढिग दिसत असेल, तर त्याच्या दक्षिण बाजूला २ पुरुष (मनुष्याची उंची ६ फूट असते) खाली खोदावे. त्यामुळे तुम्हाला गोड पाणी लागेल.
सौ. मीनाक्षी शरण यांचा परिचय
‘सौ. मीनाक्षी शरण या ‘अयोध्या फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. त्यांनी संस्कृत आणि इतिहास या विषयांमध्ये संशोधन केले आहे. वेद आणि विविध शास्त्रे यांमध्ये त्यांनी ‘सरस्वती सभ्यता आणि पवित्र नदी सरस्वतीचे महत्त्व’, या विषयावर संशोधन कार्य केले आहे. फाळणीच्या वेळी झालेल्या नरसंहाराची भीषणता त्या सर्वांसमोर मांडतात, तसेच नरसंहार झालेल्या हिंदूंसाठी त्या सामूहिक तर्पणाचे आयोजनही करतात. व्यावहारिक जीवनात व्यस्त असूनही धर्माप्रती श्रद्धा आणि तळमळ असल्यामुळे त्या नियमितपणे अध्ययन करून लोकांमध्ये हिंदु धर्म अन् संस्कृती यांविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
५. भारत जगातील ‘सर्वांत मोठा गोमांस निर्यातदार देश’ असणे दुर्दैवी !
हिंदु धर्मात गायीला चारा देण्याचे महत्त्व आहे. आज किती मुले असतील, जे गायीला चारा देतात ? गायींना चारा दिल्याने आपल्या मनात करुणा आणि प्रेम निर्माण होते. जी मुलगी प्रतिदिन गायीला चारा खाऊ घालत असेल किंवा तिच्या मस्तकावून हात फिरवत असेल, ती ‘लव्ह जिहाद’मध्ये कशी फसेल ? जिची ती प्रतिदिन पूजा करते, तिला कापून खाण्याची कल्पना तिच्या मनात कशी येऊ शकेल ? ‘गाय ही दूध, मांस आणि कातडे मिळवण्यासाठी पाळली जाते’, असे आजही शाळेत शिकवले जाते. हीच मुले शिकून पुढे नोकरशाह आणि राजकारणी बनतात. आज आपला भारत जगातील ‘सर्वांत मोठा गोमांस निर्यातदार’ झालेला आहे; कारण की, आपल्यामध्ये करुणा नावाची गोष्टच शिल्लक उरली नाही. भारतात वर्ष २०२१-२०२२ मध्ये ११ लाख ७५ सहस्र १९३ मेट्रीक टन गोमांस निर्यात झाले. ज्याच्यासाठी किमान ३ कोटी गोवंश पशूवधगृहात मारले गेले आहेत. हिंदु धर्म, आपले शास्त्र आणि आपल्या विचारसरणींच्या विरुद्ध हे घडत आहे. आपण यासाठी कुठे ना कुठे तरी जोडले जात नसू का ? त्यामुळे आज आम्ही दुःखी आहोत.
(उत्तरार्ध पुढच्या रविवारी)
– सौ. मीनाक्षी शरण, संस्थापिका, अयोध्या फाऊंडेशन, मुंबई.
उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/850544.html