Siddiqui’s Security Guard Suspended : बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाचे निलंबन
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गटाचे) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा पोलीस हवालदार आणि सुरक्षारक्षक शाम सोनावणे यांना निलंबित करण्यात आले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता अल्प झाल्याचा फायदा घेत मारेकर्यांनी गोळीबार केला, असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते. प्राथमिक चौकशीत सुरक्षारक्षकाकडून चूक झाल्याचे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांना दिवसा २, तर रात्री एका हवालदाराची सुरक्षा देण्यात आली होती.