Bulldozer Action Kanpur Restaurant : कानपूरमधील ‘मामा-भांजे’ उपाहारगृह महानगरपालिकेकडून बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त !
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथे कानपूर महानगरपालिकेने ‘मामा-भांजे’ हे उपाहारगृह बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त केले. पदपथावर अतिक्रमण करून हे उपाहारगृह बांधण्यात आले होते, तसेच याचा चालक मुबीन अहमद स्वतः हिंदु असल्याचे भासवून उपाहारगृह चालवत होता.
‘Mama-Bhanje’ a restaurant in Kanpur was destroyed by a bulldozer of the Municipal Corporation !
They had encroached on the footpath
The restaurant was run by a Muslim in the name of Hindu
Non vegetarian food was served instead of Vegetarian food
It is impossible to imagine… pic.twitter.com/HnLqZNi2nl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 19, 2024
यासह येथे शाकाहारी खाद्यपदार्थांच्या नावाखाली मांसाहारी खाद्यपदार्थ विकण्यात येत होते. अतिक्रमणाच्या संदर्भात आलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिकाने ही धडक कारवाई केली. (अतिक्रमण झाल्याची तक्रार आल्यानंतर कारवाई करणार्या कानपूर महानगरपालिकेला स्वतःला हे कसे कळत नाही ? कुणी तक्रार केली नसती, तर पालिकेला हे कधीच कळले नसते ! अशांना जनतेच्या करातून पोसायचे तरी कशाला ? शहरात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणे आहेत, याचा शोध आतातरी महानगरपालिका घेणार आहे का ? कि तक्रारींची वाट पहाणार आहे ? – संपादक) सरकारने यापूर्वीच राज्यातील सर्व ढाबे आणि हॉटेल्स यांवर मालकाचे नाव लिहिण्याचा आदेश दिलेला आहे.
संपादकीय भूमिकादेशात अशी किती उपाहारगृहे असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! |