‘आर्.टी.ई.’ अनुदान संमतीसाठी लाच घेणारी महिला अटकेत !

पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई. अंतर्गत) शाळांना अनुदान देण्यात येते. या अनुदान संमतीसाठी १२ सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सुनीता माने या मुख्य लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या प्रकरणी एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या शाळेत वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘आर्.टी.ई.’ (शिक्षणाचा अधिकार) अंतर्गत प्रवेश दिला जातो. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे एकूण १२ लाख ६९ सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क शासनाकडून येणे होते. ८ आठवड्यांच्या कालावधीत ही रक्कम संबंधित संस्थाचालकांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ही रक्कम तक्रारदारांना देण्याचे आदेश नाशिकच्या शिक्षणाधिकार्‍यांनी दिले होते. मुख्य लिपिक माने यांनी या रक्कमेवर एक टक्का लाच देण्याची मागणी केली होती.