सांगली येथे धर्मादाय कार्यालयाच्या दिरंगाईच्या विरोधात उपोषण !
सांगली, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मादाय कार्यालयातील दिरंगाईच्या कारभाराच्या विरोधात १६ ऑक्टोबर या दिवशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.द. बर्वे यांनी येथील स्टेशन चौक येथील वसंतदादा पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण केले. या कार्यालयाकडे बर्वे यांनी प्रविष्ट केलेल्या ‘वुईमेन्स एज्युकेशन सोसायटी’च्या खटल्याची सुनावणी ३३ वर्षे चालू आहे, तसेच सांगली येथील ८१ व्या साहित्य संमेलनाविषयी सुनावणी चालू आहे. सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याची बर्वे यांची तक्रार आहे. धर्मादाय आयुक्त डॉ. मनीष पवार यांच्या दिरंगाईच्या कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले.