उंदरांना पकडण्यासाठी गोंदपट्ट्या न वापरण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडून याचिका
मुंबई – भारतीय प्राणी कल्याण मंडळाने उंदरांना पकडण्यासाठी वापरण्यात येणार्या गोंदपट्ट्यांवर बंदी आणली आहे. ‘गोमट्री ट्रॅप्स’ आणि ‘अर्बुडा ॲग्रोकेमिकल्स’ या आस्थापनांच्या या गोंदपट्या असल्याने त्यांनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. ही बंदी मनमानी आणि कोणत्याही योग्य मूल्यांकनाविना घालण्यात आल्याचा दावा या आस्थापनांनी केला आहे. ऑगस्ट २०११ मध्ये या बंदीविषयी परिपत्रक काढण्यात आले होते, ते रहित करण्याची मागणी या आस्थापनांनी केली आहे.
या गोंदपट्ट्या अमानवी आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींविरोधात आहे. यामुळे अन्य जीवही दगावतात, असे प्राणी कल्याण मंडळाने म्हटले आहे. अखिल भारत कृषी गौ सेवा संघाच्या या प्रकरणी हस्तक्षेप याचिका प्रविष्ट करून गोंदपट्ट्या वापरावरील बंदीचा आदेश लागू करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय प्राणी कल्याण मंडळाने राजरोस चालू असलेल्या गोहत्यांविरोधातही अशा प्रकारे याचिका प्रविष्ट करावी ! |