राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार !
मुंबई – लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणी येथे महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आले होते. महादेव जानकर यांनी मुलाखतीमध्ये भाजप कधीही लहान पक्षांना मोठे करत नाही. लहान पक्षांचे उमेदवार स्व:पक्षात घेऊन लहान पक्षांना शक्तीहीन करतो, अशी टीका केली आहे.