थोडक्यात महत्त्वाचे
धर्मांध प्रवाशाची हिंदु तिकीट लिपिक महिलेला मारहाण !
कल्याण – कल्याण रेल्वेस्थानकात प्रवासी अन्सर शेख (वय ३५ वर्षे) याने हिंदु तिकीट लिपिक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तिकीट लिपिक महिला बेशुद्ध झाली असून तिला रुग्णालयात भरती केले आहे. तिच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरीस गेला असल्याचे सहकार्यांनी सांगितले.
संपादकिय भुमिका
रेल्वेस्थानकात एक मुसलमान रेल्वेच्या कार्यालयातील हिंदु महिलेला मारहाण करत असतांना शेकडो हिंदू निष्क्रीय रहातात, हे लज्जास्पद !
हिंदू निद्रिस्त झाल्यानेच धर्मांध हिंदु महिलांवर हात उगारतात !
विद्यार्थिनीची वसतीगृहात आत्महत्या
मुंबई – येथील वसतीगृहात २३ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील अन्वेषण चालू आहे. दीक्षा कांबळे असे मृत मुलीचे नाव असून तिचे कुटुंब देवगड (सिंधुदुर्ग) येथे आहे.
पारोळा येथे दीड लाखाची दारू नष्ट !
पारोळा (जिल्हा जळगाव) – येथे गावठी दारू बनवणार्या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करून दीड लाखाची दारू नष्ट केली आहे. या प्रकरणी ३ संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदु तरुणीला ३ भोंदू मांत्रिकांनी फसवले !
वसई – घरची आर्थिक स्थिती ठीक करण्यासाठी मांत्रिकाचे साहाय्य घेणार्या एका हिंदु तरुणीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तिची आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिने मीरा रोड येथील मुस्ताक शाह या मांत्रिकाचे साहाय्य घेतले. याच प्रकरणाच्या अंतर्गत मुस्ताकसह जावे आणि रिजाझ चौधरी या ३ भोंदू मांत्रिकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकिय भुमिका : अशांना कठोर शिक्षाच हवी !
१२ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा नोंद !
वसई – भाईंदरमधील प्रसिद्ध ‘वी अनबिटेबल’ या नृत्याच्या गटाच्या तरुणांची १२ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गटाच्या व्यवस्थापकासह ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोजा, तसेच पोलीस आयुक्तालयातील एका पोलिसाचाही समावेश आहे.
मुंबईच्या माजी महापौरांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की !
मुंबई – विक्रोळीत ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत फेरीवाल्यांनी धक्काबुक्की केली. विक्रोळीतील रस्त्यावर काही फेरीवाल्यांनी त्यांच्या धंद्यांमुळे जागा अडवली होती. रस्त्यात अडचण होत असल्याने दळवी यांनी प्लास्टिकचे क्रेट बाजूला केले. यामुळे फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.