शिबिरात सकाळी शक्तीस्तवन म्हणत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे रूप आठवणे आणि दुपारी त्यांचे दर्शन होणे

श्री. निखिल कदम

‘नोव्हेंबर २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या शिबिरात मी सहभागी झालो होतो. शिबिराच्या चौथ्या दिवशी मी सकाळी शक्तीस्तवन म्हणत होतो. मी नेहमी तुळजापूर येथील भवानीमातेची मूर्ती किंवा दुर्गादेवीचे चित्र आठवून शक्तीस्तवन म्हणतो; पण त्या दिवशी शक्तीस्तवन म्हणत असतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे रूप आठवत होते. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या एका सत्रात मी शिबिरात विषय मांडत असतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘सकाळी मी शक्तीस्तवन म्हणत असतांना त्यांचे रूप आठवणे’, ही पूर्वसूचना होती’, असे मला वाटले.’

– श्री. निखिल कदम, जळगाव (१९.११.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक