सीबीआयकडून तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा नोंद !
जळगाव येथील बी.एच्.आर्.पतसंस्थेतील १ सहस्र २०० कोटी रुपयांचे घोटाळा प्रकरण
जळगाव – येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) पतसंस्थेतील १ सहस्र २०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर, तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार आवेदनावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले होते. त्यानंतर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी ‘सीबीआय’ने नवटाके यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
भाग्यश्री नवटाके यांनी १ सहस्र २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या पथकाचे नेतृत्व केले होते. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला.
संपादकीय भूमिकाभरघोस वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही पोलीस उपायुक्तांसारखे अधिकारी भ्रष्टाचार करतात ! अशा भ्रष्ट अधिकार्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. |