साधकांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रणव मणेरीकर (वय ४५ वर्षे) !
‘उद्या आश्विन कृष्ण चतुर्थी (२०.१०.२०२४) या दिवशी मथुरा सेवाकेंद्रातील श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. यांना ४५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. काटकसरीपणा
मागील १५ वर्षांपासून प्रणवदादांची आणि माझी आध्यात्मिक मैत्री आहे. प्रणवदादा महागडे कपडे विकत न घेता अल्प किमतीतील कपडे घेतात. ते अन्य साधकांनाही तसे करण्यास सांगतात.
२. साधकांना साहाय्य करणे
अ. दादा त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक साधकाला सर्वतोपरी साहाय्य करतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो.
आ. मी दादांना माझी अडचण सांगतो किंवा त्यांना काही प्रश्न विचारतो. तेव्हा ते मला माझे पूर्ण समाधान होईपर्यंत त्याविषयी सांगतात. त्यामुळे मलाही त्यांचा आधार वाटतो.
इ. सेवाकेंद्रात कोणतीही अडचण असली, तरी ते ती सोडवतात.
३. सेवेची तळमळ
अ. दादा सेवाकेंद्रातील सेवा दायित्व घेऊन करतात.
आ. समष्टी सेवा अधिकाधिक चांगली होण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. ते सेवा करतांना व्यापक स्तरावर विचार करतात. त्यामुळे त्यांना नवीन कल्पना सुचतात.
४. समाजातील लोकांनी कौतुक करणे
एकदा प्रणवदादा त्यांच्या रुग्णाईत आईला घेऊन आधुनिक वैद्यांकडे गेले होते. तेव्हा आधुनिक वैद्यांनी त्यांना विचारले, ‘‘आई एवढी रुग्णाईत असतांना तुम्ही फारच शांत दिसता. तुम्ही देवाचे काही करता का ?’’ त्या वेळी त्यांनी ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे’, असे सांगितले. तेव्हा आधुनिक वैद्यांनी त्यांचे कौतुक केले.’
– श्री. निरंजन चोडणकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५० वर्षे), युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (ऑक्टोबर २०२४)