Bajrang Dal : पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोरच बजरंग दलाच्या नेत्याला धर्मांध मुसलमानाकडून मारहाण !

उळ्ळाल (कर्नाटक) येथील घटना

उळ्ळाल (कर्नाटक) – अपघाताशी संबंधित प्रकरणावर पोलीस ठाण्यात चर्चा चालू असतांना पोलीस निरीक्षकांच्या कक्षातच बजरंग दलाचे उळ्ळाल शहर आणि प्रखंड संयोजक अर्जुन माडुरू यांच्यावर केरळमधील महंमद आसिफ (वय ३३ वर्षे) याने आक्रमण केले.

यानंतर हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्याला घेराव घातला. यानंतर पोलिसांनी आसिफ याला कह्यात घेतले.

पोलीस निरीक्षकांच्या कक्षातच आक्रमण (प्रतिकात्मक चित्र)

तोक्कोट्टू येथील उड्डाणपुलावर १६ ऑक्टोबरच्या रात्री कुंपल येथील शरथ आणि केरळमधील इब्राहिम खलील यांच्या गाड्यांमध्ये छोटासा अपघात झाला. या प्रकरणात खलील आणि त्याचा भाऊ आसिफ यांनी शरथ यांच्यावर आक्रमण केले. यावरून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्या वेळी ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राज्यात मोकाट सुटलेले धर्मांध ! पोलीस ठाण्यात हिंदु नेत्यावर हात उचलण्यास मागे-पुढे न पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्यास घाबरणारे पोलीस हिंदूंचे रक्षण काय करणार ?