PM Modi Russia Visit : पंतप्रधान मोदी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी रशियाला जाणार !
नवी देहली – येत्या २२ आणि २३ ऑक्टोबर या दिवशी रशियातील कझान येथे होणार्या ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या देशांची संघटना) परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. रशिया ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही या परिषदेला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात येथे भेट होऊ शकते. वर्ष २०२२ मध्ये बाली, इंडोनेशिया येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेमध्ये या दोघांची भेट झाली होती.