Taiwan Office In Mumbai : मुंबईत तैवानचे कार्यालय चालू केल्याने चीन संतप्त !

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग

बीजिंग (चीन) – मुंबईत तैवानचे ‘तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर’ हे नवीन कार्यालय चालू करण्यात आले आहे. यावर चीन संतप्त झाला असून त्याने याचा निषेध केला आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, जगात एकच चीन आहे आणि तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. चीन तैवान आणि इतर देशांमधील सर्व प्रकारच्या अधिकृत संपर्क आणि परस्परसंवाद यांना विरोध करतो, ज्यामध्ये इतर देशांमध्ये प्रतिनिधी कार्यालये स्थापन केली जातात. भारताने तैवानशी संबंधित सूत्रे योग्यरित्या हाताळावीत आणि तैवानशी कोणत्याही प्रकारची अधिकृत चर्चा करू नये. चीन आणि भारत यांच्यातील संबंध बिघडू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

‘तैपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर’ने मुंबईत एक शाखा उघडली. त्यामुळे भारतातील त्यांच्या कार्यालयांची संख्या ३ झाली. यापूर्वी केवळ देहली आणि चेन्नई येथे तैवानचे कार्यालय होते.

संपादकीय भूमिका

  • तैवान स्वतंत्र देश आहे असून अशा देशांसाठी भारत सहकार्य करण्यास सिद्ध आहे. भारत चीनचा बटिक नाही की, चीनला जे वाटेल ते भारताने करावे.
  • चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा जगाला ठाऊक आहे आणि भारतानेही ती अनुभवली आहे. त्यामुळे चीनला समजेल अशा भाषेत भारताने उत्तर दिले पाहिजे !