तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन करणे आवश्यक ! – कु. मनीषा माहूर

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार पडले !

कु. मनीषा माहुर

मथुरा (उत्तरप्रदेश) – आज व्यक्ती, कुटुंब, कार्यालय, समाज सर्वत्र तणाव आहे. तणावामुळे मनुष्य दुःखी होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्येही तणाव दिसून येतो. अशा स्थितीत शिक्षकही तणावात रहातात. सर्व शिक्षकांना तणावमुक्तीसाठी तात्काळ किंवा बाह्य उपाय योजण्यापेक्षा षडरिपू अर्थात् व्यक्तीमधील दोष दूर करून गुण वाढवण्याची आवश्यकता आहे. ‘आपल्या आरोग्यासाठी आध्यात्मिक भागासह शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक भाग आवश्यक आहे’, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत आपल्या ऊर्जावान मनाला तणावाखाली न ठेवता आध्यात्मिक अंगाचा विकास करण्यासाठी काळानुसार नामस्मरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाची ऊर्जा वाया न जाता वाढेल आणि जीवन सुखकर होईल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या कु. मनीषा माहूर यांनी केले.

प्रवचन ऐकणारे शिक्षक

सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये शिक्षकांसाठी ‘तणाव निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी व्याख्यानाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या मार्गदर्शनाचा महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. कैलाश पचौरी यांच्यासह अनेक शिक्षकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे शंकानिरसन करण्यात आले.