आधुनिक वैद्या सौ. नंदिनी सामंत यांनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे साधिकेचे चिंतन होऊन तिला स्वभावदोष-अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतून आनंद मिळू लागणे

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत

१. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांना मनातील विचार सांगितल्यावर त्यांनी ‘भीती वाटणे’ आणि ‘प्रतिमा जपणे’ यांतील फरक लक्षात आणून देणे

‘मी माझ्या मनात आलेल्या विचारांच्या संदर्भात सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत यांच्याशी काही वेळा बोलते. एकदा मी त्यांना माझ्या मनात येणारे विचार सांगितल्यावर त्यांनी मला दृष्टीकोन दिला आणि त्याचा मला लाभ झाला. मी नंदिनीताईंना सांगितले, ‘‘माझ्याकडून सेवेत काही चुका झाल्यास त्याविषयी उत्तरदायी साधकांना सांगण्यास मला भीती वाटते.’’ त्या वेळी नंदिनीताईंनी मला सांगितले, ‘‘ही भीती नाही, तर हे ‘प्रतिमा जपणे’ आहे. आपल्या मनाला ‘योग्य आणि अयोग्य काय ?’ हे समजवायला हवे.’’

कु. सुषमा लांडे

२. सौ. नंदिनीताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर स्वभावदोषांविषयी चिंतन होऊन ताण न्यून होऊ लागणे

त्यानंतर एकदा मी औषधाची गोळी घेण्यास विसरले. त्या वेळी ‘सहसाधिकेने विचारल्यावर काय सांगू ?’, असे वाटून मला भीती वाटली. माझ्या मनात भीतीचा विचार आल्यावर मला लगेच मनाला सांगता आले की, ‘ही भीती नसून मी माझी प्रतिमा जपत आहे. औषधाची गोळी घेण्याचे गांभीर्य माझ्यात नसल्यामुळे ही चूक घडली आहे.’ पूर्वी मनात भीतीचा विचार आल्यामुळे मला ताण यायचा. आता तो ताण न्यून झाला आहे. माझ्याकडून एखादी चूक झाल्यावर ‘ती कोणत्या स्वभावदोषामुळे झाली ?’ यावर चिंतन करून तो स्वभावदोष दूर करण्याचा प्रयत्न आता होत आहे. त्यामुळे मला स्वभावदोष-अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतील आनंद घेता येत आहे.’

– कु. सुषमा लांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.५.२०२४)