पुणे येथे बुलेट चोरणार्‍या युवकाला अटक !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथे एका युवकाला ‘ऑनलाईन गेम’ खेळण्याचे व्यसन होते. या व्यसनामध्ये तो पुष्कळ पैसे हरला. (ऑनलाईन गेममध्ये अनेक युवक पैसे गमावून गैरमार्गाकडे वळत आहेत. याकडे प्रशासन आणि पोलीस लक्ष देणार का ? – संपादक) त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी त्याने यू ट्यूबवर दुचाकी चोरी कशी करायची ? हे पाहिले. बुलेट चोरल्यास अधिक पैसे मिळतात, हे लक्षात आल्यावर त्याने एक एक करत एकूण १८ बुलेट चोरल्या. पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि संबंधित युवकास अटक केली.