सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी करणारा आरोपी अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी हरियाणा येथे जाऊन मोठी कारवाई केली. अभिनेता सलमान खान याचे पनवेल येथे फार्म हाऊस आहे. त्याची रेकी करणार्‍या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणामधील पानिपत येथून अटक केली आहे. त्याचे नाव ‘सुक्खा’ असे असून त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. आरोपीविरुद्ध नवी मुंबईमध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. आरोपी सुक्खा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे.