सिद्दीकींच्या मारेकर्‍यांकडून ३ पिस्तुल जप्त

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बाबा सिद्दीकी यांच्या मारेकर्‍यांकडून पोलिसांनी ३ पिस्तुल जप्त केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन बनावटीची ग्लॉक पिस्तुल, टर्किश पिस्तुल आणि एक देशी बनावटीची पिस्तुल असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यात प्रवीण लोणकर, शुभम लोणकर आणि महंमद झिशान अख्तर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत शिजला. सिद्दीकी यांच्या घराची पहाणी करतांना दुचाकीचा अपघात झाला. त्यामुळे त्यांनी हत्येच्या दिवशी दुचाकी न वापरण्याचा निर्णय घेतला. प्रवीण लोणकर याला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली होती. महंमद झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तैनात केली आहेत.

१२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाबा सिद्दीकी यांनी निर्घृण हत्या झाल्यानंतर बिष्णोई गटाच्या ४ जणांना पकडण्यात आले आहे. हत्येच्या आधी घंटाभर आरोपी वांद्रे पूर्व येथे होते. संशयित आरोपींकडून २ पिस्तुल, ३ मॅगझीन, २८ काडतुसे, ५ भ्रमणभाष, २ आधारकार्ड जप्त करण्यात आली होती.