सच्चिदानंद परब्रह्म डॉ आठवले यांच्या सत्संगात तळहात गुलाबी होण्याच्या संदर्भात साधिकांना आलेल्या अनुभूती
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. ‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे ‘गुलाबी’ झाल्याचे जाणवले.’ – सौ. शालन गोरख लोहोकरे, सिंहगड रस्ता, पुणे.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संपूर्ण सत्संगाच्या कालावधीत मला माझ्या दोन्ही हातांच्या बोटांची नखे, बोटे आणि तळहात गुलाबी रंगाचे झाल्याचे आढळले. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते आणि मला उत्साह जाणवत होता. सत्संग संपल्यानंतर अर्ध्या घंट्याने हळूहळू तो गुलाबी रंग न्यून झाला.’ – श्रीमती रजनी साळुंके (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |