‘इमर्जन्सी’ चित्रपटाला केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र
मुंबई – कंगना राणावत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाला केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. ही माहिती खासदार आणि अभिनेत्री कंगना यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर दिली आहे.
हा चित्रपट इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. शीख समुदायाने याच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.