श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे अल्पवयीन मुलावर ९ अल्पवयीनांचा अत्याचार !
अहिल्यानगर – श्रीरामपूर शहरात ११ वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ९ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारेही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. (अल्पवयीन मुले असे अनैसर्गिक अत्याचार करतात, यातून समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे लक्षात येते. समाजाची अधोगती रोखायची असेल, तर धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संपादक) पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींना कह्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली.
संपादकीय भूमिका :अल्पवयीन मुलांनी अत्याचार करणे, तसेच युवकाने चोरी करणे, ही मुलांची स्थिती म्हणजे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! |